मनोहर विमानतळावरून आणखी 8 ठिकाणी सेवा

0
11

मोप येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी आणखी 8 नवी देशी ठिकाणे उड्डाणासाठी जोडण्यात आली असून, त्यामुळे आता मनोहर विमानतळावरून एकूण 21 देशी स्थळांना जोडला गेला आहे. ‘आयटा’ अंतर्गत उन्हाळी उड्डाणे 26 मार्चपासून सुरू झालेली असून, ती 28 ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहेत. जोडण्यात आलेल्या 8 नव्या उड्डाण स्थळांमध्ये अमृतसर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, गुवाहाटी, रांची, राजकोट, विशाखापट्टणम व लखनऊ यांचा समावेश आहे.

या आठ स्थळांपैकी 7 स्थळांवर इंडिगो ही विमान कंपनी सेवा देणार आहे, तर लखनऊ या एका ठिकाणावर विस्तारा ही विमान कंपनी सेवा देणार आहे, अशी माहिती काल मोप विमानतळातर्फे देण्यात आली. यापूर्वी मोपवरून दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरू, मुंबई, कोलकाता, पुणे, नाशिक, जयपूर, चेन्नई, नागपूर, वाराणसी व चंदीगड येथे विमान सेवा सुरू आहे. आतापर्यंत 7 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर 5 हजार विमान उड्डाण झालेली आहेत.