गुजरातमधील गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेस व आम आदमी पार्टीला मात्र मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत भाजपाने ४४ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत निर्विवादपणे आपले वर्चस्व सिद्ध केले, तर कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ दोन जागा, तर आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवरच समाधान मानावे लागले.