मद्याच्या नशेत वाहन चालविल्या प्रकरणी म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने एका मालवाहू ट्रकच्या चालकाला दोषी ठरवून त्याला पाच दिवसांचा साधा कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा काल फर्मावली. बुधवार 28 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजता पर्वरी येथील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ट्रकचालक कृष्णा राम याची चाचणी केली असता तो मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्याची अल्कोमीटरच्या साहाय्याने तपासणी केली असता त्याने मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले त्यांच्याविरोधात म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.