मतांच्या विभाजनासाठी तृणमूल, आप गोव्यात

0
27

>> कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांचा आरोप

तृणमूल कॉंग्रेस व आम आदमी पार्टी हे भाजपचा पाठिंबा लाभलेले पक्ष असून, हे दोन्ही पक्ष धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्यासाठी राज्यात आले असल्याचा आरोप काल कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला. तसेच कॉंग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी युती करण्यास तयार असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.

तृणमूल कॉंग्रेस व आम आदमी पार्टी हे पक्ष राज्यात मतांची विभागणी करण्यासाठी आले आहेत. लोकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी हे दोन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोपही यावेळी दिनेश गुंडू राव यांनी केला. कॉंग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचे षडयंत्र केवळ गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी युती करण्यास तयार आहे. स्थानिकांशी बांधिलकी असलेल्या पक्षांशीच कॉंग्रेस युती करेल, असेही ते म्हणाले.