पुलवामा जिल्ह्यातील मंगळवारी मतदान होणार असलेल्या एका मतदान केंद्रावर दहशतवाद्यांकडून ग्रेनड हल्ल्याची घटना घडली. यात सीआयएसएफचा एक जवान जखमी झाला. हल्ला झाला ते ठिकाण उच्च माध्यमिक विद्यालय असून सध्या मतदान केंद्रात त्याचे रुपांतर केले आहे. जखमी जवान तेथे गस्तीवर होता.