निवडणूक आयोगाने मणिपूरमधील विधानसभेच्या ६० जागांसाठी होणार्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत. त्यामुळे दोन टप्प्यात पार पडणार्या मतदानातील पहिल्या टप्प्याचे मतदान २७ फेब्रुवारीऐवजी २८ फेब्रुवारीला, तर दुसर्या टप्प्यातील मतदान हे ३ मार्चऐवजी ५ मार्च रोजी होणार आहे.
मणिपूरच्या पहिल्या टप्प्यातील मतदारासंघातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी होती, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शुक्रवारी आहे. या पहिल्या टप्प्याचे मतदान २७ ला पार होणार होते; पण आता ते २८ फेब्रुवारीला होईल. दुसर्या टप्प्यातील मतदारसंघासाठी उमेदवारांना अर्ज भरण्याची सुरुवात शुक्रवारी होणार असून, अर्ज मागे घेण्याची मुदत १६ फेब्रुवारीपर्यंत असेल. या टप्प्यातील मतदान ३ मार्चऐवजी आता ५ मार्चला पार पडणार आहे.