मणिपूर : ‘त्या’ घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

0
8

मणिपूरमध्ये एका जमावाने दोन महिलांची नग्न अवस्थेत रस्त्यावरून धिंड काढण्याची जी लज्जास्पद घटना घडली, त्या घटनेबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शून्य तासाला गोवा विधानसभेत दु:ख व्यक्त केले. ही अत्यंत वाईट अशी घटना असून, पीडीत महिलांविषयी त्यांनी यावेळी सहानुभूती व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, आरोपींवर कडक करवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांनी आता या घटनेविषयी उगीच नाटक करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

तत्पूर्वी काल अधिवेशन सुरू झाल्यानंतर आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस व क्रूज सिल्वा यांनी मणिपूर येथे झालेल्या या घटनेवरून गदारोळ माजवत सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेकडे धाव घेत या प्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले म्हणणे स्पष्ट करावे, अशी मागणी केली होती.