मडगावात घरात घुसून २.५ लाखांचा ऐवज लंपास

0
105

आबाद ङ्गारिया रस्ता मडगाव येथील ज्युलिया ङ्गर्नांडिस या वृद्धेच्या घरात घुसून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख १५ हजार व विदेशी चलन मिळून अडीच लाख रुपयांचा ऐवज अज्ञातांनी पळविला. सर्व दरवाजांची कुलपे ठीक होती. मात्र चोर कोठून घुसले ते समजू शकले नाही. मडगाव पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली आहे.