मडकईकर चौकशी प्रकरणात भाजप खासदारांचा हस्तक्षेप

0
81

>> २० लाखांची कुपन्स खरेदी

 

कुंभारजुवेचे भाजप
उमेदवार पांडुरंग मडकईकर यांनी गोवा बागायतदार सहकारी सोसायटीकडून घेतलेल्या २० लाख रुपयांच्या कुपन्स चौकशी प्रकरणी बागायतदार सोसायटीचे अध्यक्ष तथा दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप अ. भा. कॉंग्रेस सचिव गिरीश चोडणकर यांनी केला.
वरील प्रकरणी मडकईकर यांच्याविरुद्ध तक्रारही दाखल झाली आहे. या तक्रारीची चौकशी सुरू असल्याने सावईकर यांनी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे गरजेचे होते, असे चोडणकर यांनी सांगितले. मडकईकर यांनी वरील कुपने स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून मतदारांना देण्यासाठी घेतली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने वरील खर्चाचा निवडणूक खर्चात समावेश करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली.
दरम्यान, कोणत्याही लष्करी जवानांचे मतदार यादीत नाव नोंदविण्यापूर्वी सदर जवान यापूर्वी कोणत्या राज्यात होता, तेथील यादीतील नाव रद्द करणे आवश्यक असते. परंतु या निवडणुकीच्यावेळी निवडणूक अधिकार्‍यांनी कायद्यातील नियमांचे पालन केलेले नाही. त्याची चौकशी करण्याची मागणीही चोडणकर यांनी केली आहे.