सत्ताधारी भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी सर्व प्रमुख समविचारी पक्षांनी एकत्रित यावे यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आम आदमी पक्षाने मात्र आपण तृणमूल किंवा मगो पक्षाच्या युतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून सहभागी होणार नसल्याचे काल रविवारी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिषी सिंग यांनी काल वरील खुलासा करताना आपचा तृणमूल कॉंग्रेस व मगो यांच्या युतीमध्ये सहभागी होण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. आम्ही त्यांच्याशी युती करणार नसल्याने त्या संबंधी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.