मंगळसूत्र हिसकावले

0
114

म्हापसा येथील श्रीदेव बोडगेश्‍वराच्या जत्रेस येऊन देवदर्शन घेऊन घरी जात असताना काल रात्री ९.३० च्या सुमारास अज्ञात मोटरसायकल स्वारांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना वासियोवाडो गिरवडे-बार्देश येथे घडली. याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरवडे येथील शिल्पा मयेकर ही महिला आपला मुलगा व जाऊबाई यांच्यासमवेत काल संध्याकाळी देवदर्शनासाठी जत्रेला आली होती. देवाचे दर्शन घेऊन काही वस्तू खरेदी करून चालत घरी जात असता वासियो वाड्यावर निर्जन स्थळी पोचली असता समोरून येणार्‍या मोटर सायकलवरील बसलेल्या मागील तरुणाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकल सुसाट सोडली.