भोम येथील अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार

0
244

भोम येथे बाजार परिसरात झालेल्या मालवाहू कंटेनर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील स्नेहा महादेव प्रभू (२१, कलमामळ-बोरी) ही जागीच ठार झाली. दुचाकीचालक वंदित विजयश्याम म्हार्दोळकर (२१, म्हार्दोळ) हा किरकोळ जखमी झाला. हा अपघात काल बुधवारी सकाळी घडला. दोघेही खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयातील तिसर्‍या वर्षातील विद्यार्थी आहेत.

फोंड्याहून कळंगुटच्या दिशेने निघालेल्या कंटेनरला (एचआर-४४ एए-४७४३) त्याच दिशेने जाणार्‍या दुचाकीची (जीए-०५ एन-८६१६) निसटती टक्कर झाल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात स्नेहा प्रभू ही रस्त्यावर आपटल्याने व नंतर ट्रकच्या टायरचा धक्का डोक्याला लागल्याने ती जागीच ठार झाली. दोघेही खांडोळा महाविद्यालयात जात होती. अपघातग्रस्त ट्रकचालक मेहबूब गुतारी (३९) मूळ हुबळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातीची माहिती फोंडा पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी इस्पितळात पाठवला. दरम्यान,

खांडोळा सरकारी महाविद्यालयातर्फे मयत स्नेहा हिच्या अकाली निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यात आला.