>> नरेंद्र मोदी-शेख हसीना यांची नवी दिल्लीत भेट; परस्पर द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौर्यावर आल्या असून, काल दुपारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी परस्पर द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी सात करारांवर स्वाक्षर्या केल्या.
दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी या भेटीत संरक्षण, रेल्वे, माहिती-तंत्रज्ञान, अंतराळ, अणुऊर्जा या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
मोदी म्हणाले की, विकासकामांमध्ये बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा भागीदार आहे. दोन्ही देशांतील सहकार्याची पातळी सातत्याने सुधारत आहे. आम्ही माहिती तंत्रज्ञान, अंतराळ आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास सहमती दर्शवली आहे.
गेल्या वर्षी आम्ही बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एका फेरीचे आयोजन केले होते. अमृत काळाच्या पुढील २५ वर्षांमध्ये आपली मैत्री नवीन उंचीवर पोहोचेल, असेही मोदी म्हणाले.
शेख हसीना म्हणाल्या की, आमची प्राथमिकता लोकांचे प्रश्न, गरिबी हटवणे आणि अर्थव्यवस्था विकसित करणे आहे. भारत-बांगलादेश हे दोन्ही देश एकत्र काम करतील, जेणेकरून संपूर्ण दक्षिण आशियातील लोक त्यांचे जीवन भारत-बांगलादेशमधील ७ करार
१. भारत-बांगलादेश सीमेवरील कुशियारा नदीचे पाणी कमी करण्याबाबतचा करार. २. बांगलादेश रेल्वेच्या अधिकार्यांना भारतीय रेल्वे प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. ३. भारत बांगलादेश रेल्वेला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मदत करेल. या अंतर्गत भारत बांगलादेशला मालवाहतूक व्यवस्थापन प्रणाली आणि इतर माहिती-तंत्रज्ञान आधारित क्षमता वाढविण्यात मदत करेल. ४. बांगलादेशी कायदेशीर अधिकार्यांच्या प्रशिक्षणासाठी बांगलादेशचे सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमी यांच्यात करार. ५. भारत आणि बांगलादेशच्या विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये करार. ६. भारत आणि बांगलादेश दरम्यान अंतराळ क्षेत्रातील सहकार्याबाबत करार. ७. भारताची प्रसार भारती आणि बांगलादेश टीव्ही यांच्यात टीव्ही प्रसारणाच्या क्षेत्रात करार. चांगल्या पद्धतीने जगू शकतील.
संपूर्ण आशियामध्ये, बांगलादेशातून निर्यातीसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या प्रगतीला आणखी वेग देण्यासाठी आम्ही लवकरच द्विपक्षीय आर्थिक सर्वसमावेशक भागीदारी करारावर चर्चा सुरू करू. तसेच आगामी काळात भारत-बांगलादेश संबंध नवीन उंची गाठतील.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान