भारत – पाकिस्तान यांच्यात मैत्रीसंबंध गरजेचे : इम्रान खान

0
70

पाकिस्तानमध्ये सत्तापालट झाला असून ११८ सर्वाधिक जागा जिंकत क्रिकेट मैदान गाजविलेल्या इम्रान खानच्या राजकीय पक्षाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इम्रान खान पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तान निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इम्रान खानने भारताशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणार असल्याचे सांगितले. एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंधांवर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांची पत्रकार परिषद त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यात त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा मांडला. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पाळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. १९९६ मध्ये राजकीय पक्षाची स्थापना केली. आता आम्हांला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. जिनांच्या स्वप्नातील पाकिस्तान प्रत्यक्षात आणायचा आहे. हे माझे स्वप्नं आहे. भारताशी सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. भारत-पाकिस्तान यांच्यातला व्यापार हा दोन्ही देशांसाठी फायद्याचा ठरेल, असे ते म्हणाले.