भारत दौर्‍याद्वारे लेनिंगचे पुनरागमन

0
93

ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार मेग लेनिंग भारताविरुद्धच्या एकदिवसीय व टी-२० सामन्यांच्या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे तब्बल सात महिने तिला क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. अष्टपैलू सोफी मोलिनेक्स व निकोला केरी या नव्या चेहर्‍यांनादेखील भारत दौर्‍यासाठी निवडण्यात आले आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाची अष्टपैलू ताहिला मॅकग्रा व न्यू साऊथ वेल्सची वेगवान गोलंदाज लॉरेन चिटल यांना मात्र दुखापतीमुळे संघात स्थान मिळालेले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ ३ मार्च रोजी भारतासाठी रवाना होईल. ६ मार्च व ८ मार्च रोजी दोन सराव सामने खेळले. १२ मार्चपासून वडोदरा येथे तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविली जाणार आहे. यानंतर इंग्लंडचा समावेश असलेली तिरंगी मालिका मुंबईत होणार आहे.

ऑस्ट्रेलिया वनडे संघ ः मेग लेनिंग (कर्णधार), राचेल हेन्स, निकोल बोल्टन, निकोला केरी, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हिली, जेस जोनासन, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, बेलिंडा वाकेरेवा, एलिस विलानी व अमांडा जेड वेलिंग्टन.
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ ः मेग लेनिंग, राचेल हेन्स, निकोला केरी, ऍश्‍ले गार्डनर, ऍलिसा हिली, जेस जोनासन, डेलिसा किमिन्से, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शूट, नाओमी स्टेलिनबर्ग, एलिस विलानी व अमांडा जेड वेलिंग्टन.