कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काल कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या. त्यांनी राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या अन्य सहकार्यांसोबत पदयात्राही केली. त्यामुळे कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला.
कर्नाटकातील मांड्या येथे सोनिया गांधींनी काल भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. त्या जकन्नाहल्ली येथे पोहचल्या आणि पांडवपुरा तालुक्यातून सकाळी १०.३० वाजता पदयात्रेत सहभागी झाल्या.
सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे कर्नाटकात पक्षाला अधिक बळकटी येईल, असा विश्वास कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.