भारतातील १२ शहरे पाण्याखाली जाणार

0
43

>> गोव्यातील मुरगावलाही धोका

जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीने आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. अहवालात तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत असल्यामुळे या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील १२ शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यात गोव्यातील मुरगावचाही समावेश आहे. इतर शहरांत मुंबई, चेन्नई, कोची, विशाखापट्टणम ही शहरे आहेत. मुरगाव शहरात २.०७ फूट एवढे पाणी असेल असे अहवालात म्हटले आहे.