भारतातील पहिला इबोला रुग्ण दिल्लीत आढळला

0
98

जिवघेण्या इबोला रोगाची लागण झालेला भारतातील पहिला रुग्ण काल आढळून आला. हा रुग्ण भारतीय असून तो लायबेरिया येथून नुकताच आला आहे. त्याला दिल्ली विमानतळावरील खास खोलीत ठेवण्यात आले आहे. या रुग्णाचे वय २६ असून गेल्या १० रोजी भारतात दाखल झाला होता. आफ्रिकेत त्यांना या रोगावर उपचार घेतल्याचे सांगण्यात आले. त्याच्या विर्यात इबोला रोगाचे अंश आढळून आले आहेत.