भारताची हरनाझ संधू बनली ‘मिस युनिवर्स’

0
7

भारताच्या हरनाझ संधू हिने ‘मिस युनिवर्स २०२१’चा किताब पटकावला. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट प्रदान करण्यात आला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. तिच्या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. २१ वर्षीय हरनाज संधूने नुकताच ‘मिस डीवा मिस युनिवर्स इंडिया २०२१’ किताब आपल्या नावे केला होता.