राज्यात नव्या १५ कोरोनाबाधितांची नोंद

0
7

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत १३९६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५ नमुने बाधित आढळून आले. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३८२ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत एकाही कोरोना बळीची नोंद नाही. कोरोना बळींची एकूण संख्या ३४८२ एवढी आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ४४ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८५ टक्के एवढे आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने १ बाधिताला इस्पितळात दाखल करून घेण्यात आले. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १.०७ टक्के एवढे आहे.