टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकला 61 धावांनी नमवले
स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाने भारत गटात अव्वल
टी-20 विश्वचषकात काल झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. स्पर्धेच्या इतिहासात धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह भारतीय संघ सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला. सलग तीन विजयांसह भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.
रविवारी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान 18 षटकांत 114 धावांतच सर्वबाद झाला. उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 175 धावा केल्या. इशान किशनने 40 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने 32 धावा केल्या. सईम अयुबने 3 विकेट घेतल्या.