भाभासुमंच रविवारपासून अधिक आक्रमक

0
97

>> कुजिरा येथे ३८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा

 

इंग्रजी शाळांचे अनुदान सरकारने बंद न केल्याने भाभासुमंचा राजकीय विभाग सक्रीय झाला असून रविवार दि. १७ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत ३८ मतदारसंघांतील सुमारे ६०० कार्यकर्त्यांचा मेळावा कुजिरा येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संकुलात आयोजित केल्याची माहिती मंचाचे सहनिमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

मातृभाषारक्षक अभियान
याच मेळाव्यात मातृभाषा रक्षक नोंदणी अभियानाचा शुभारंभ होईल. संपूर्ण गोव्यात किमान २ लाख भाषाप्रेमी मतदारांना मातृभाषा रक्षणासाठी प्रतिज्ञा देण्याचे सुमारे ५०० कार्यक्रम दि. १८ जुलै ते ३१ ऑगस्ट या काळात होईल, असे त्यांनी सांगितले.
दुसर्‍या टप्प्यातील जाहीर सभा
दुसर्‍या टप्प्यातील जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून २४ जुलै फोंडा, ३१ जुलै धारबांदोडा, ६ ऑगस्ट म्हापसा, दि. १३ काणकोण, दि. १७ पर्वरी, दि. २० वास्को, दि. २५ पणजी, दि. २७ मडगाव व दि. ३० रोजी डिचोली येथे सभा होईल.
अनुदान बंद करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. त्यामुळे १७ सदस्यीय समिती स्थापन करून सरकारने जनतेच्या डोळ्यात धुळ ङ्गेकण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण प्राधिकरणाचे काम अनुदानावर निर्णय घेण्याचे नसून शिक्षण माध्यम अभ्यासक्रम यावर निर्णय घेण्याचे असते, असे वेलिंगकर व ऍड. उदय भेंब्रे यांनी सांगितले. कॉंग्रेस सरकारने राबविलेले अनुदान धोरणच भाजपने पुढे नेले आहे. त्यांना त्याचे निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने स्थापन केलेल्या १७ सदस्यीय समितीत भाभासुमंच्या किंवा ङ्गोर्सच्या सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले आहे. असे असतानाही भाभासुमंचे प्रा. अनिल सामंत, प्रा. माधव कामत व कांता पाटणेकर यांचा समावेश कसा, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता, कदाचित त्यांना न कळवताच समितीत त्यांच्या नावांचा समावेश केलेला असावा. अजूनपर्यंत सामंत, पाटणेकर व कामत यांच्याशी संपर्क करणे शक्य न झाल्याचे ऍड. भेंब्रे यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.
पत्रकार परिषदेस फ. मॉजिइन आताईत, नागेश करमली, सुभाष देसाई, अरविंद भाटीकर व वल्लभ केळकर उपस्थित होते.