भाज्यांची आवक घटल्याने दर कडाडले

0
13

राज्यात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटोचा दर प्रतिकिलो 80 ते 100 रुपयापर्यंत पोहोचला आहे. तसेच, ओल्या मिरचीचा दर प्रतिकिलो 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच इतर भाज्यांच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. मोसमी पावसाला विलंब आणि वाढत्या उष्णतेमुळे भाज्यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजीची आवक घटली आहे.