पंतप्रधान नरेंद्र ’ोदी यांच्या प्रशासनावर जोरदार टीका करून ’ोदी पंतप्रधानपदावर आरुढ झाल्यापासून स’ाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचा कॉंग्रेसाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल केला. सर्वधर्म समभावाच्या तत्वाला छेद देण्याच्या घटना प्रत्येक दिवशी घडत असतात. त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचेही फालेरो म्हणाले.पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने फालेरो पत्रकारांसमोर बोलत होते. आपल्या पक्षाला १३० वर्षांचा इतिहास आहे. कॉंग्रेस हा जगातील सर्वात मोठा लोकशाही मानणारा पक्ष आहे. या पक्षाचे जनमानसात पुन्हा स्थान निर्माण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे आवाहन फालेरो यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. जातीयवादाला, धर्मांधतेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करणार्या लोकांनी या देशाचा इतिहास बदलण्याचे प्रयत्न करणार्या लोकांनी या देशाचा इतिहास बदलण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. नाताळाची सुटी रद्द करण्याचे कटकारस्थानही रचण्याचा प्रयत्न झाला. ‘घरवापसी’च्या नावाखाली धर्मांतराचे प्रकार चालू आहेत. त्यामुळे सहिष्णूतेला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात फालेरो यांच्या हस्ते पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.