भाजप चिंतन बैठकीत मगो युतीवर चर्चा

0
82

उत्तर गोव्यातील कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये काल संध्याकाळी उशिरा भाजपच्या विधिमंडळ सदस्यांची चिंतन बैठक सुरू झाली असून या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची विशेष उपस्थिती होती. मात्र, या बैठकीला सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी उपस्थित राहण्याचे टाळले. जिल्हा पंचायत निवडणुका तसेच मगोकडील युती टिकवायची की नाही, अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.