भाजपा 400 सोडाच 200 पार करणे कठीण

0
134

>> काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर यांचा दावा

लोकसभा निवडणुकीत भाजप (एनडीए) आघाडीला 400 पार सोडाच 200 पार करणे कठीण असल्याचे काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर यांनी सांगितले. देशात काँग्रेस सरकार पुढील 50 वर्षे येणार नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वक्तव्य केले होते. त्याला काँग्रेस नेते डॉ. थरूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांत इंडिया आघाडीने वर्चस्व प्राप्त केल्याचा दावा त्यांनी केला.

देशात काँग्रेस पक्ष पुढील 50 वर्षे सत्तेत येणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या विधानाला अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नेते डॉ. शशी थरूर यांनी उत्तर देताना सांगितले की, देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यांत एनडीए पिछाडीवर आहे. यामुळे देशात भाजप 400 पार सोडाच 200 पार होणे कठिण असल्याचे डॉ. थरूर यांनी सांगितले. काँग्रेस नेते डॉ. थरूर यांचे गुरुवार (दि. 2) रोजी गोव्यातील दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे नेते एल्विस गोम्स व इतरांनी त्यांचे स्वागत केले. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून भाजपाला 200 पार करणे सद्याच्या स्थितीत कठीण असल्याचा दावा डॉ. थरूर यांनी यावेळी केला.