महाराष्ट्रात भाजप सरकारला पाठिंबा देण्यास शिवसेना जवळ जवळ तयार झाली आहे. मात्र सेना मंत्रिमंडळात सामील होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्हा कायम आहे. दरम्यान, आज मुंबईत भाजप आमदारांची बैठक होत असून यावेळी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडला जाणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस (४४) हे प्रबळ नाव आहे. विधिमंडळाच्या बैठकीत नेता निवडीनंतर राज्यपालांची भेट घेण्यात येईल, असे भाजप सरचिटणीस राजीव प्रताप रुढी यांनी सांगितले. नव्या सरकारचा शपथविधी ३१ रोजी करण्याचे ठरत आहे.