Home बातम्या भाजपच्या मंत्रिमंडळ बैठकीतमहिला आरक्षणला मंजुरी

भाजपच्या मंत्रिमंडळ बैठकीतमहिला आरक्षणला मंजुरी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन अधिनियमातील सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून वाढवून 816 केल्या जातील, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी आरक्षित असतील. सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवून 16 ते 18 एप्रिलपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे, ज्यात हे सुधारणा विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा 31 मार्च 2029 पासून लागू होईल. त्याच वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तो पहिल्यांदाच प्रभावी होईल. प्रस्तावानुसार आरक्षण ‘उभ्या’ र्(ींशीींळलरश्र) आधारावर लागू होईल, म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षित जागांमध्येही महिलांसाठी वाटा निश्चित केला जाईल.