भाजपची उद्या होणारी रॅली निषेधार्ह ः कॉंग्रेस

0
121

चीन सीमेवर लढताना भारतीय सैनिकांना बलिदान द्यावे लागते. देशाच्या सीमेचे व आपल्या सैनिकांचे रक्षण करणे भाजपला जमत नाही, परंतु मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळाची वर्षपूर्ती करुन उत्सव साजरे करण्याची भाजपची कृती निषेधार्ह आहे. लोकांना व खास करुन विद्यार्थ्याना गोव्यात नेटवर्क मिळत नसताना, भाजपच्या रॅलीला नेटवर्क कसा मिळतोअसा सवाल कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल मडगावात केला. सरकारकडून आज प्रत्येक गोमंतकीय आर्थिक मदतीची वाट पाहत आहे. भाजप सरकारने केवळ घोषणा व रॅली आयोजित करुन उत्सव साजरे न करता लोकांना रोख मदत देण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.