Home Featured भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

भाजपची आज महत्त्वपूर्ण बैठक

0

मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल, अशी जोरदार चर्चा काल सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले. मात्र भाजपने गावडे यांच्यावर कारवाईबाबत काल कोणताही निर्णय घेतला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि गोविंद गावडे यांच्यातील नियोजित बैठक काल झाली नाही. सदर बैठक आता शुक्रवारी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाला हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे; मात्र मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे काल टाळले. तसेच, मंत्री गोविंद गावडे यांनीही मंत्रिमंडळातून वगळण्यासंबंधीच्या वृत्ताबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. आता गोविंद गावडे यांच्यावर भाजपकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गोविंद गावडे यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी गुरुवारी बैठक होणार असल्याचे जाहीर केले होते; नियोजित बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली.