कांदोळी येथील सावियो डायस यांच्या घरात भाड्याने राहणार्या जेनेट फ्रान्सिस क्राऊन (५५) या ब्रिटिश पर्यटक महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. दोन महिन्यांपूर्वी क्राऊन विरोसवाडा-कांदोळी येथील डायस यांच्या घरात भाड्याने रहाण्यास आली होती. जेनेट क्राऊन या महिलेच्या खोलीचे दार काल सकाळी उघडे न दिसल्याने घरमालक सावियो यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा जेनेट हिने टीशर्टच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे नजरेस पडले. कळंगुट पोलिसांना कळविल्यानंतर उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीकरिता गोमेकॉत पाठवून दिला आहे.