ब्रिटनचे पंतप्रधान सुनक इस्त्रायल दौऱ्यावर

0
8

>> मोदींनी केली पॅलेस्टाईन राष्ट्रपतींशी चर्चा

इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाला 13 दिवस झाले असून हे युद्ध अजूनही सुरू आहे. एक दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्त्रायलच्या तेल अवीव येथे दौऱ्यावर गेले होते. त्या वेळी त्यांनी इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्याहून यांची भेट घेतली होती. जो बायडेन यांच्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी इस्त्रायलचा दौरा केला. तेल अवीव येथे गेल्यानंतर सुनक यांनी, या अवघड परिस्थितीत ब्रिटन इस्त्रायलच्या कायम सोबत आहे. परंतु इराण, जॉर्डन, लेबनानसहित काही आणखी मुस्लिम देश इस्त्रायलच्या विरोधात बोलत आहेत. परंतु याचा विचार न करता इस्त्रायलकडून गाझा भागात हल्ला केला जात असल्याचे सांगितले. ब्रिटन पंतप्रधान ऋषी सुनक इस्रायलशी एकजूट दाखवण्यासाठी तेल अवीवमध्ये पोहोचले आहेत. येथे ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुधवारी, 18 ऑक्टोबर रोजी इस्रायलला पोहोचले. त्यांनी तेल अवीवमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, राष्ट्राध्यक्ष इसाक हरझोग आणि युद्ध मंत्रिमंडळाची भेट घेतली व अमेरिकेला परतले.
आतापर्यंत 4000 बळी
गाझा भागातील पॅलेस्टाईनच्या मृत्यूचा आकडा 4000च्यावर गेला आहे. यात 1524 लहान मुले, 1000 महिला आणि 120 जेष्ठ नागरिकांचा व इतर नागरिकांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केली
पॅलेस्टाईन राष्ट्रपतींशी चर्चा

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी संपर्क साधला. गाझामधील अल-अहली दवाखान्यात झालेल्या स्फोटात नागरिकांचे बळी गेल्याबद्दल मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. मोदींनी या वेळी पॅलेस्टाईनला जी काही मानवीय मदत लागेल ती करण्यात येईल असे सांगितले.

हमासकडे 203 इस्त्रायली ओलीस
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 306 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने गाझामध्ये किमान 203 लोकांना ओलीस ठेवले आहे.