दहशतवाद व ऊर्जा सुरक्षेबाबत रशिया भारतासोबत
अमेरिका भारत यांच्यात व्यापार करारा झाल्यानंतरही रशियाने रशियाने ब्रिक्सच्या अध्यक्षपदासाठी भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेच्या दबावामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली किंवा थांबवली असली तरी, दोन्ही देशांमधील मैत्रीवर याचा परिणाम होणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या वतीने हे विधान केले.
रशियाचा पूर्ण पाठिंबा
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या वतीने एक निवेदन जारी केले. ब्रिक्सच्या अध्यक्षाच्या रुपात भारताला रशिया पूर्ण पाठिंबा देत आहे आणि ब्रिक्सच्या अजेंड्याला पूर्ण करण्यासाठी भारतासोबत उभा आहे. सध्याच्या परिस्थितीत, दहशतवाद आणि ऊर्जा सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर भारताचा अजेंडा समर्पक आणि तर्कसंगत आहे. त्यामुळे ब्रिक्स शिखर परिषदेत भारताने मांडलेला अजेंडा सध्याच्या आव्हानांवर तोडगा काढण्यास सक्षम आहे. म्हणूनच रशिया प्रत्येक स्तरावर भारताला साथ देईल असे रशियाने म्हटले आहे.
पाकिस्तानची चिंता
रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, पाकिस्तानवर दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे आरोप आहेत. भारताने दहशतवादासोबतच पाकिस्तानविरुद्धही मोहीम उघडली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही मोहीम अधिक तीव्र झाली आहे. त्यामुळे ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा प्रमुख राहील आणि रशिया या मुद्द्यावर भारताला साथ देईल. संयुक्त राष्ट्रांमध्येही रशियाने भारतासोबत मिळून जागतिक दहशतवादविरोधी अजेंडा राबवला आहे.
रशियाशी संबंध, ट्रम्प प्रशासनाचा दबाव
ट्रम्प प्रशासन भारतावर रशियाकडून तेल व्यापार थांबवण्यासाठी दबाव टाकत आहे. याच अटीवर अमेरिकेने भारतासोबत 500 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार करार केला. रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने दंड म्हणून आकारलेले 25 टक्के शुल्क रद्द करण्यात आले आहे. अमेरिकेच्या दाव्यानुसार रशियाकडून तेल खरेदी करून जो पैसा भारत देतो, त्याचा वापर रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धात करतो. त्यामुळे अमेरिका रशिया आणि भारतामधील तेल व्यापार सुरू राहावा असे इच्छित नाही.