ब्रह्मेशानंद स्वामींनी घेतली पंतप्रधानांची भेट

0
24

श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील निवासस्थानी विशेष भेट घेतली. यावेळी देशात नवीन संसद भवनाची निर्मिती, जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन, नारी शक्ती वंदन विधेयक तसेच इतर अनेक राष्ट्रीय तसेच भविष्यातील घडामोडींवर चर्चा केली.
यावेळी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे समस्त गोमंतकीयांच्यावतीने स्वामींनी अभिनंदन करुन शिवशंकरांची मूर्ती भेट देऊन श्रीदत्तपीठाचे शुभाशीर्वाद प्रदान केले. या भेटीदरम्यान हिंदू धर्माशी निगडीत संस्कृती आणि राष्ट्रोत्थान व विश्वगुरू भारत संकल्पना साकार करण्यासाठीची कार्यपद्धती अशा विषयांवर स्वामींनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावेळी हिंदू धर्म आचार्य सभेचे अध्यक्ष जुना आखाडा आचार्य महामण्डलेश्वर स्वामी अवधेशानंदगिरीजी, संयोजक स्वामी परमात्मानंद सरस्वतीजी, स्वामी ज्ञानानंदजी, स्वामी कृष्णमणिजी, धन्यानंद जी आदि संत उपस्थित होते.
पंतप्रधान निवासातील निजी सचिवांनी सर्वांचे यथोचित स्वागत केले.