>> मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
बोरी येथे जुवारी नदीवर नवीन पूल तसेच, ङ्गोंडा तिस्क-ढवळी ते बोरीपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाला प्राधान्यक्रम दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ङ्गोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या खासगी ठरावावर बोलताना विधानसभेत काल दिली.
ङ्गोंडा तिस्क – ढवळी ते बोरीपर्यंतचा मुख्य रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच, वरच्यावर अपघात होत आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी सोडवावी, असा खासगी ठराव ङ्गोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी विधानसभेत मांडला होता.
बोरी येथील जुवारी नदीवरील नवीन पूल आणि रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे वर्ष २०२१ -२०२२ च्या अंदाजपत्रकात समाविष्ट करून घेण्यासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळवून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी या खासगी ठरावावर बोलताना सांगितले.
ङ्गोंडा तिस्क ते बोरीपर्यंतचा रस्ता अरुंद आहे. या रस्त्याच्या बाजूला घरे, दुकाने असल्याने रुंदीकरण करताना अडचणी येत आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविला होता. तथापि, मागील वार्षिक अंदाजपत्रकात या रस्त्याच्या कामाचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे नव्याने या रस्त्यासंबंधी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.
आमदार सुदिन ढवळीकर, आमदार सुभाष शिरोडकर यांनी ठरावावरील चर्चेत सहभाग घेतला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी चर्चेत सहभागी होऊन नवीन बोरी पूल आणि रस्त्याच्या कामाला प्राधान्यक्रम देण्याची ग्वाही दिली. मंत्री पाऊसकर यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर रवी नाईक यांनी आपला खासगी ठराव मागे घेतला.
अटल सेतूचे उर्वरित
बांधकाम डिसेंबरपर्यंत
मांडवी नदीवरील अटल सेतू या तिसर्या पुलाचे शिल्लक बांधकाम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. येत्या ३० मेपर्यंत अटल सेतूवरील डांबरीकरण व वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणली जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आमदार रोहन खंवटे यांच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिली.
मांडवी नदीवरील अटल सेतू हा तिसरा पूल दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मागील दोन वर्षात पर्वरी आणि मेरशीच्या बाजूने वाहतुकीत सुसूत्रता नसल्याने गैरसोय होत आहे. पुलावर खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना त्रास होतो. पुलावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दिशादर्शक ङ्गलक योग्य नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. वाहतूक पोलीस केवळ वाहन चालकांना दंड ठोठावण्याचे काम करीत आहेत, असे आमदार खंवटे यांनी सांगितले.
पुलाचे बांधकाम करणार्या कंपनीकडून पुलाचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करून घेतले जाणार आहे. पुलावर वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघात होत आहेत. अपघात रोखून वाहतुकीत सुसूत्रता आणण्याची सूचना करण्यात आली आहे. पणजीला जोडणारा या पुलाचा भाग डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.