बोरीतील नवीन पुलासाठी भूसंपादन अधिसूचना जारी

0
20

फोंडा तालुक्यातील बोरी येथे झुआरी नदीवर नवीन पूल आणि बगल रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भूसंपादन अधिसूचना जारी केली असून, नागरिकांना हरकती आणि सूचनांसाठी 21 दिवसांची मुदत दिली आहे.

या नवीन पूल आणि बगल मार्गासाठी सुमारे 3,93,184 चौरस मीटर जमीन संपादित केली जाणार आहे. एनएच 566 वरील प्रस्तावित बगल रस्त्याची लांबी 5.73 किलोमीटर एवढी आहे. आक्षेप विशेष भूसंपादन अधिकारी, पीडब्लूडी-राष्ट्रीय महामार्ग, आल्तिनो, पणजी-गोवा यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करता येतील.