वाहतूक पोलीस अधीक्षकांची माहिती; वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर निर्णय; मद्यधुंद, अतिवेगाने वाहन चालवणारे रडारवर
वाहतूक पोलीस आणि जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात मंगळवार दि. २ ऑगस्टपासून सुसाट व अतिवेगाने वाहन चालवणार्या आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणार्या चालकांविरोधात खास मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती गोवा पोलिसांच्या वाहतूक मुख्यालयातील पोलीस अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी काल दिली. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या दोन अपघातांत पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्याने बेशिस्त चालकांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.