बेल्जियम उपउपांत्य फेरीत दाखल

0
96
Belgium's midfielder Nacer Chadli (R) scores his team's winning goal past Japan's goalkeeper Eiji Kawashima (L) during the Russia 2018 World Cup round of 16 football match between Belgium and Japan at the Rostov Arena in Rostov-On-Don on July 2, 2018. / AFP PHOTO / Jack GUEZ / RESTRICTED TO EDITORIAL USE - NO MOBILE PUSH ALERTS/DOWNLOADS

रॉबर्टो मार्टिनेझच्या बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना काल सोमवारी रात्री उशिरा झालेल्या फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील ‘अंतिम १६’ फेरीतील लढतीत ३-२ असा विजय साकार केला. या विजयासह ‘रेड डेव्हिल्स’म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेल्जियमने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
अतिरिक्त वेळेतील अखेरच्या मिनिटाला (९० + ४) चाडलीने केलेला गोल बेल्जियमसाठी निर्णायक ठरला. चाडलीने गोल केल्यानंतर पुढच्या काही सेकंदातच सामना संपल्याची शिट्टी वाजली आणि जपानचे आव्हान आटोपले.

पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसर्‍या सत्रात जपानने पाच मिनिटात दोन गोल करत २-० अशी आघाडी घेतली. जपानने यापूर्वी विश्‍वचषकाच्या बाद फेरीत एकही गोल नोंदविला नव्हता. त्यामुळे जपानची ही आघाडी अचंबित करणारी ठरली. ४८व्या मिनिटाला गेनकी हारागुची याने खाते उघडले. गाकू शिबासाकी याच्या पासवर या गोलाची नोंद झाली. ५२व्या मिनिटाला शिंजी कागावा याने रचलेल्या अप्रतिम चालीवर इनुई याने २५ यार्ड अंतरावरून मारलेल्या फटक्याने चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. उजवीकडे झेपावत चेंडू अडविण्याचा बेल्जियमच्या गोलरक्षकाने प्रयत्न यशस्वी ठरला नाही.

६९ व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरचा फायदा घेत जॅन व्हेर्तोंघे याने बेल्जियमसाठी पहिला गोल केला आणि आघाडी कमी केली. त्यानंतर लगेचच पाच मिनिटांनी ङ्गेलायनीने दुसरा गोल करुन २-२ अशी बरोबरी साधून दिली. सामना अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच चाडलीने जपानच्या गोल क्षेत्रात धडक देत सुरेख मैदानी गोल झळकवत संघाचे उपांत्यपूर्व ङ्गेरीचे तिकिट पक्के केले. उपांत्यपूर्वङ्गेरीत बेल्जियमची गाठ पाचवेळच्या विश्‍वविजेत्या ब्राझिलशी पडणार आहे. यंदाच्या विश्‍वचषकात तब्बल ९ गोल ९० मिनिटे झाल्यानंतर नोंद झाले आहे. यावेळेत यापूर्वीच्या पाच विश्‍वचषकात मिळून १० गोलांची नोंद झाली होती. विश्‍वचषकाच्या बाद ङ्गेरीत दोन गोलच्या पिछाडीनंतर पुनरागमन करुन विजय मिळवणारा बेल्जियम हा गेल्या ४८ वर्षांतला पहिलाच संघ ठरला. १९७० साली पश्‍चिम जर्मनीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व दोन गोलच्या पिछाडीनंतर इंग्लंडवर ३-२ असा विजय मिळविला होता.

दुसर्‍या बाजूला जपान तिसर्‍यांदा उपांत्यपूर्व ङ्गेरीत दाखल होण्यात अपयशी ठरला. जपानचा संघ तिसर्‍यांदा ‘अंतिम १६’ मध्ये पोहोचला होता. याआधी २००२ सालच्या विश्‍वचषकामध्ये तुर्की त्यानंतर २०१० मध्ये पॅराग्वेने जपानला बाद ङ्गेरीत पराभूत केले होते.