बेतकी खांडोळा सरपंचांविरोधात पंच सदस्यांचा अविश्वास ठराव

0
2

प्रियोळ मतदारसंघांचे आमदार गोविंद गावडे यांना बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर काल गुरूवारी दुपारी बेतकी – खांडोळा सरपंचांविरोधात पंच सदस्यांनी फोंडा गट विकास कार्यलयात अविश्वास ठराव दाखल केला. त्याचप्रमाणे डच्चू दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच माशेल येथे रात्री अज्ञातांनी फटक्यांची अतिषबाजी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी संध्याकाळी मंत्री गोविद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यामुळे प्रियोळ मतदारसंघात राजकीय हालचालीना वेग येऊ लागला आहे. सर्वप्रथम बेतकी – खांडोळा पंचायतचे सरपंच विशांत नाईक यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. गटविकास अधिकारी कार्यलयात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर दिलीप नाईक, मनोजकुमार नाईक, निकिता सत्यवान फडते, उदय तुकाराम नाईक व रामिता रोहिदास गावडे या पंच सदस्यांनी सह्या केल्या आहेत. प्रियोळ मतदारसंघात बेतकी – खांडोळा, वेलिंग- प्रियोळ, भोम- अडकोण, तिवरे- वरगाव, वेरे-वाघुर्मे, वळवई व केरी पंचायतीचा समावेश
आहे.