बेकायदा बांधकामे कायदेशीर करणारा वटहुकुम जारी

0
102

राज्यात २८ फेब्रुवारी २०१४ पर्यंत उभारण्यात आलेली राज्यातील खाजगी बेकायदेशीर बांधकामे नियमित करणारा वटहुकुम सरकारने काल जारी केला.

जारी झाल्या दिवसापासून १८० दिवसांच्या आत संबंधितांनी संबंधित यंत्रणांकडे अर्ज करावे लागतील. अशा बेकायदेशीर बांधकामांमध्ये स्वत:च्या मालकीच्या जाग्यातील निवासी, व्यापारी, मुंडकार म्हणून बांधलेली कुळाने शेतजमीन मालकाने उभारलेले फार्म हाऊस विभाजन न झालेल्या मालमत्तेतील बांधकाम, आवश्यक परवाने घेऊन एखाद्या संस्थेच्या जमिनीवरील बांधकाम, व्यापारी हेतूने १०० चौ. मीटर जागेतील बांधकाम, २५० चौ. मी. जागेतील व्यापारी निवासी बांधकाम, ४०० चौ. मी. जागेत एखाद्या संस्थेसाठी केलेले बांधकाम यांचा यात समावेश आहे.

दरम्यान, राज्यातील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासंबंधीच्या वटहुकूमास काल राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासंबंधीच्या फाईलवर सर्कुलेट पध्दतीने मंत्र्यांच्या सह्या घेऊन मान्यता मिळविण्यात आली. काल पर्वरी येथे मंत्री, आमदारांची बैठक झाली. या बैठकीतही वरील विषयावर चर्चा झाली. आगामी विधानसभा अधिवेशनाचा कार्यक्रम, अर्धवट राहिलेले विकास प्रकल्प व राजकीय परिस्थिती यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.