बेंगळुरू येथे ११ दिवसांत ५४३ मुले कोरोनाबाधित

0
36

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असतानाच बंगळुरूमध्ये गेल्या ११ दिवसांत ५४३ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवड्यात बंगळुरूतील ५४३ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. ही मुले १ ते १९ वयोगटातील आहेत.

यातील बहुतेक मुलांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत. तर काही जणांमध्ये कोणतीच लक्षणे नाहीत. आता कर्नाटक सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे. कर्नाटमध्ये काही दिवसांपूर्वी शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.