बु्रनो फर्नांडिस यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0
10

कॉंग्रेस हा एकमेव धर्मनिरपेक्ष पक्ष असून, या पक्षाने नेहमीच जनतेच्या हितासाठी काम केले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षालाच मतदान करावे, असे आवाहन काल आपचे माजी सरचिटणीस ब्रुनो फर्नांडिस व गोवा तृणमूल कॉंग्रेसचे माजी सचिव सुकूर सेबी मिनेझिस यांनी कॉंगे्रस पक्षात प्रवेश केल्यानंतर केले. ऍड. कार्लुस आल्वारिस फेरेरा, एल्विस गोम्स, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके आदींच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.