‘बीसीसीसीआय’च्या उपाध्यक्षपदी शुक्ला?

0
150

आयपीएलचे माजी अध्यक्ष शुक्ला आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष होऊ शकतात. महीम वर्मा यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशचे काम पाहण्यासाठी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा काही दिवसापूर्वीच दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे, उपाध्यक्षपदाची रिक्त जागा एका विशेष सर्वसाधारण बैठकीद्वारे ४५ दिवसांमध्ये भरता येते. परंतु कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊनमुळे ते शक्य होणार नाही. दरम्यान आयपीएलचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शुक्ला यांनी ३ वर्षांचा ‘कुलिंग ऑफ पिरियड’ पूर्ण केला आहे. गांगुली आणि सहकार्‍यांनी बीसीसीआयची सूत्रे हाती घेतती त्यावेळी शुक्ला यांचा ‘कुलिंग ऑफ पिरियड’ंमधील आठ महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता.