बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास श्रीनिवासनना हरकत

0
91

सर्वोच्च न्यायालयाचा दणका; आयपीएल सट्टेबाजी
२०१३मधील इंडियन प्रिमियर लीगमधील सट्टेबाजी आणि सामना संगनमत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना जबर दणका दिला आहे. श्रीनिवासन यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये स्वारस्य असल्यास त्यांनी बीसीसीआयपासून दूर रहावे असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.आयपीएल स्पॉट ङ्गिक्सिंग प्रकरणातीत संशयित असलेले चेन्नई सुपर किंग्जचे सहमालक तथा श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मैयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा सट्टेबाजी प्रकरणी दोषी असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकार्‍यांना आयपीएल संघ खरिदण्याची सवलत देणार्‍या ६.२.४ कलमावर सर्वोच्च न्यायालयाने तोफ डागली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रथम अध्यक्ष असलेले एन. श्रीनिवासन यांना आपला आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि बीसीसीआय अध्यक्षपद यांपैकी एकाची निवड करण्याचा सल्ला दिला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाशी व्यावसायिक हितसंबंध असेपर्यंत श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले असून बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक सहा आठवड्यांच्या आत पुन्हा घेण्याचे आदेशही दिले.
आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी न्यायालयाने १३० पानांचे निकालपत्र दिले आहे. मयप्पन यांना श्रीनिवासन यांनी पाठीशी घातल्याचा आरोप न्यायालयाने ङ्गेटाळून लावला. तसे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. सट्टेबाजीप्रकरणी मुदगल समितीने दिलेला अहवाल सर्व नियमांचे पालन करून दिला असून, या अहवालावर ङ्गेरविचार करण्याची काहीही गरज नसल्याचे न्यायमूर्तींनी आदेशात म्हटले आहे. मुदगल समितीने राज कुंद्रा यांची बाजू नोंदवून घेतली आहे. त्यामुळे त्यांनी तक्रार करण्याचे कारण नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. श्रीनिवासन यांना आयपीएलचा संघ विकत घेता यावा, यासाठी बीसीसीआयच्या घटनेमध्ये बदल करण्याचा प्रकार गैर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. एङ्ग. एम. आय. कलिङ्गुल्ला यांच्या खंडपीठाने गेल्यावर्षी १७ डिसेंबरला या प्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. ऑगस्ट २०१३ पासून या प्रकरणात न्यायालयाकडून वेगवेगळे अंतरिम आदेश देण्यात आले आहेत. सट्टेबाजीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने निवृत्त न्या. मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. समितीने आपला अहवाल दोन भागांमध्ये न्यायालयाकडे सुपूर्द केला होता.
आदेशातील ठळक मुद्दे
मैयप्पन, कुंद्राही सट्टेबाजी प्रकरणात दोषी.
मैयप्पनला पाठीशी घातल्याच्या आरोपातून श्रीनिवासन मुक्त; पण आयपीएल फ्रँचाइजमध्ये स्वारस्य असल्याचा ठपका.
चेन्नई सुपर किंग्जची मालकी सोडल्याविना बीसीसीआय निवडणूक लढविण्यास मज्जाव.
येत्या सहा आठवड्यात निवडणूक घेण्याचा बीसीसीआयला आदेश.
मैयप्पन, कुंद्रा, सीएसके आणि राजस्थान रॉयल्सची शिक्षा ठरविण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त.