बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असून ते अत्यवस्थ आहेत. रांची येथील रिम्स रुग्णालयात लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी लालू प्रसाद यादव यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला नाही. त्यानंतर लालूप्रसाद यादव मानसिक तणावात गेले. लालूप्रसाद यांची किडनी सध्या फक्त २५ टक्के काम करत आहे. गल्या काही दिवसांत त्यांच्या किडनी कार्यक्षमतेमध्ये घट झाली आहे.