बिहारचे पुढील मुख्यमंत्री नितीशकुमारच ः शहा

0
223

बिहारमध्ये ‘जर-तर’चा प्रश्न असणार नाही. जदयूपेक्षा भाजपाच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमारच होणार अशी जाहीर घोषणाच गृहमंत्री अमित शहा यांनी केली. यावेळी शहा म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बिहार विधानसभा निवडणुकीत दोन-तृतीयांश बहुमत मिळेल. मुख्यमंत्रिपदासाठी या ठिकाणी ‘जर-तर’ असणार नाही. बिहारमध्ये नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील, याची आम्ही सार्वजनिकरित्या घोषणा केली आहे आणि आम्ही याला बांधील आहोत. जरी भाजपने जदयूपेक्षा जास्त जागा मिळवल्या तरीही नितीशकुमार हेच पुढील मुख्यमंत्री असतील.

दरम्यान, यावेळी लोजपाचे प्रमुख चिराग पासवान यांनी शुक्रवारी जदयूला मतदान करणे म्हणजे राज्याला मागे घेऊन जाणे ठरेल, अशी टीका केली होती. तसेच जर लोजपा सत्तेत आली तर ‘प्रथम बिहार, प्रथम बिहारी’ या वाक्याचा अवलंब करू अशी घोषणा केली होती. यावर अमित शहा यांनी, चिराग यांनी त्यांना पंतप्रधान मोदींचे हनुमान असे संबोधले होते. मात्र, यावरुन भाजपने त्यांना कुठल्याही भ्रमात न राहू नये असा सल्ला दिला.