‘बिपरजॉय’मुळे गुजरातेत विद्ध्वंस

0
6

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये लँडफॉल सुरू झाले असून, लँडफॉलनंतर द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विद्ध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहणार आहे. किनारी भागातील अनेक झाडे, वीज खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने शेवटच्या क्षणापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ देवभूमी द्वारकेपासून 120 किलोमीटर अंतर दूर अंतरावर होते.
चक्रीवादळाचा मोठा तडाखा कच्छच्या किनाऱ्याला तसेच देवभूमी द्वारकेला बसण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या 18 तुकड्या तैनात असून, लष्कर, नौदल आणि वायुदलाचीही मदत घेण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आठ किनारी जिल्ह्यांमधून यापूर्वीच 94 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. एकट्या कच्छ जिल्ह्यातून 34 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. कच्छ जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.