बिनशर्त युद्धबंदीला रशियाचा नकार

0
1

एकीकडे युक्रेनने रशियावर सर्वात मोठा हल्ला केल्यानंतर या दोन देशांदरम्यान मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे मात्र युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधी मंडळामध्ये शांततेसाठी चर्चा झाली. मात्र यावेळी रशियाने बिनशर्त युद्धबंदीला नकार दिला आहे. तुर्कीमधील सिरागन पॅलेसमध्ये या दोन्ही देशाचे प्रतिनिधीमंडळ एकत्र भेटले आणि युद्धबंदीसाठी शांतता करारावर चर्चा झाली. तुर्कीच्या मध्यस्तीने झालेली ही चर्चा एक तासाहून अधिक काळ झाली. मात्र दोन्ही देशांनी एकमेकांच्या कैद्यांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे.