दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. यादरम्यान भाजपचे माजी खासदार आणि दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाबाबत बोलताना आतिशी यांना पत्रकार परिषदेत बोलताना रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले.
वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना आतिशी यांना अश्रू अनावर झाले. मी रमेश बिधुरी यांना सांगू इच्छिते की माझ्या वडिलांनी जन्मभर शिक्षक म्हणून काम केले. आज ते 80 वर्षांचे आहेत. ते इतके आजारी असतात की आधाराशिवाय चालूही शकत नाहीत, असे आतिशी म्हणाल्या.
रमेश बिधुरी यांनी प्रचारसभेत प्रतिस्पर्धी उमेदवार आतिशी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वत:चा बापच बदलला, असे म्हटले होते.