बार्ज मालकांच्या समस्या सोडवणार ः सीतारामन

0
92

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची गोवा बार्ज मालक संघटनेचे अतुल जाधव यांनी भेट घेऊन बार्ज उद्योजकांना भेडसावणार्‍या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. जीएसटी मंडळाच्या ३७ व्या बैठकीच्या ठिकाणी अर्थमंत्री सीतारामन यांची बार्ज मालक संघटनेचे जाधव यांनी भेट घेतली. खाण व्यवसाय बंद पडल्याने बार्ज मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितल्यावर या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्‍वासन सीतारामन यांनी दिल्याचे जाधव म्हणाले.